‘रिचार्ज शाप्ट’मुळे पाणीपातळी ‘स्टेबल’!

By admin | Published: April 3, 2017 02:09 AM2017-04-03T02:09:42+5:302017-04-03T02:09:42+5:30

मार्चमध्ये अडीच ते तीन मीटरची नोंद; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संकल्पनेचे फलित

'Stealable' water level due to 'recharge'! | ‘रिचार्ज शाप्ट’मुळे पाणीपातळी ‘स्टेबल’!

‘रिचार्ज शाप्ट’मुळे पाणीपातळी ‘स्टेबल’!

Next

वाशिम, दि. २- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने २0१४ आणि २0१५ या दोन वर्षांंंंंत ह्यरिचार्ज शाप्टह्ण संकल्पना वापरून ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे उभारले. यामुळे जमिनीच्या वर पाणी दिसत नसले, तरी जमिनीखालची पाणीपातळी ह्यस्टेबलह्ण राहणे शक्य झाल्याची माहिती येथील वरिष्ठ वैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी दिली.
भौगोलिकदृष्ट्या वाशिम जिल्ह्याचा आकार छत्रीसारखा असून, उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडे उतार आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाळ्यात कोसळणारे ८0 ते ९0 टक्के पाणी वाहून जाते. जिल्ह्यातील अधिकांश भूभाग ह्यबेसाल्टह्ण खडकाने व्यापलेला आहे. परिणामी, जमिनीत मुरणार्‍या पाण्याचे प्रमाणही केवळ ८ ते १0 टक्के आहे. तथापि, लहान नाल्यांवाटे पावसाचे वाहून जाणारे पाणी टप्प्याटप्प्याने साठवून त्याचे पुनर्भरण केले तरच जिल्ह्यात सिंचनाची प्रभावी सोय निर्माण होऊू शकेल. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्यगॅबियनह्ण बंधारे उभारण्याची अभिनव संकल्पना राबविली. यासाठी गाव परिसरातील उंच ठिकाणच्या लहान नाल्यांची निवड करुन त्यात गॅबियन बंधारा (जाळीचा बांध) टाकण्यात आला. उपलब्ध नाल्यांमध्ये २0 मीटर खोलीचा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन खाली २५ ते ३0 मीटर अंतरावर पुनर्भरण चर खोदण्यात आला. त्याची खोली अडीच ते तीन मीटर ठेवण्यात आली. त्यात पुन्हा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन भूमिगत बंधारा घेण्यात आला. यामुळे पुनर्भरण चरामध्ये साठलेले पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध लागला आहे. सोबतच जिल्ह्यातील ५0 पेक्षा अधिक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे जलस्रोतांची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळाली आहे.

गॅबियन पद्धतीच्या बंधार्‍यांमुळे मार्च महिन्यातही जमिनीखालची पाणीपातळी अडीच ते तीन मीटर असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागातील विहिरी, हातपंपांच्या विद्यमान स्थितीमधील पाणीपातळीची तपासणी करूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
- बलवंत गजभिये
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वाशिम

Web Title: 'Stealable' water level due to 'recharge'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.