शिवजयंतीनिमित्त शहरात निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:00+5:302021-02-21T05:18:00+5:30
शिवजयंती उत्सवावर यंदा कोरोना संसर्गाचे सावट आल्याने शिवप्रेमींचा हिरमोड झाला, परंतु रिसोड येथील जागृती मंडळातील रोहित दांदडे, अश्विन तुरूकमाने, ...
शिवजयंती उत्सवावर यंदा कोरोना संसर्गाचे सावट आल्याने शिवप्रेमींचा हिरमोड झाला, परंतु रिसोड येथील जागृती मंडळातील रोहित दांदडे, अश्विन तुरूकमाने, मयूर ईप्पर, रोशन वानखेडे, नितीन खोडके, धोंडू तायडे, महेंद्र भगत., सचिन मोरे, आकाश पाटील, नकुल अनसिंगकर, नितीन शिरसाट, प्रतीक मंत्री, मयूर वाळले, अनंत शिंदे, सचिन ईप्पर, नीलेश शिंदे., अमित जाधव, जगदीश बोडखे, कार्तिक तुरूकमाने, रवी दांदडे, मनोज अनसिंगकर., अजय शिंदे., अक्षय मंत्री, किरण खंदारे, दामोधर गरकळ, आशिष धोपटे, गणेश मोरे, कृष्णा वानरे, कुशल सावळे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त कुठलाही बडेजाव न करता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून थेट शहरातील बस स्टॅन्ड, शासकीय रूग्णालय, तहसील कार्यालय., नगर परिषद, पोलीस स्टेशन, शहरातील मुख्य रस्त्यांवर सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले, तसेच प्रत्येक नागरिकाने मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.