Sting Operation : पडीक शासकीय इमारतीत दारुच्या पार्ट्या व जुगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:31 PM2020-07-11T12:31:37+5:302020-07-11T12:31:45+5:30

अडगळीत असलेल्या जागेवर दारुच्या पाटर्या व जुगार खेळणे सुरु केले असल्याचे लोकमतने १० जुलै रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले.

Sting Operation: Liquor parties and gambling in a abondend government building! | Sting Operation : पडीक शासकीय इमारतीत दारुच्या पार्ट्या व जुगार!

Sting Operation : पडीक शासकीय इमारतीत दारुच्या पार्ट्या व जुगार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर शहरातील वाईन बार, मनोरंजन केंद्र बंद असल्याने काही जणांनी शहरातील पडीक शासकीय ईमारतीसह अडगळीत असलेल्या जागेवर दारुच्या पाटर्या व जुगार खेळणे सुरु केले असल्याचे लोकमतने १० जुलै रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरुन उघडकीस आले.
शहरातील सर्वच वाईन बार बंद असल्याने दारु पिणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यावर तोडगा म्हणून अनेकांनी शॉपमधून दारु खरेदी करुन ती शहरातील जुन्या जिल्हा परिषद ईमारत परिसरात, जुन्या नगरपरिषद परिसरात तसेच शहरातील इतर अडगळीत जागेवर पिणे सुरु केले असल्याच्या माहितीवरुन स्टींग आॅपरेशन केले असता सदर प्रकार उघडकीस आला. जुन्या जिल्हा परिषद ईमारतीमध्ये जुगार सुरु असतांना जुगार खेळणाऱ्यांनी तेथून पळ काढला. विशेष म्हणजे या ईमारतीच्या बाजुला लागूनच ग्रामीण पोलीस स्टेशन आहे. जुन्या नगरपरिषद आवारात जागोजागी दारुच्या बाटल्या आढळून आल्यात. काही दिवसापूर्वी रिसोड रस्त्यावरील एका शेतात सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाºया ४ ते ५ जणांना चांगलाच चोप दिला होता.


असे केले स्टिंग ऑपरेशन
वाशिम शहरामध्ये जुनी जिल्हा परिषद, नगरपरिषद ईमारतीचे स्थानांतरण झाल्यानंतर तेथे कोणतेच कार्यालय नाही. नगरपरिषदमध्ये एका खोलीत केवळ जलसंधारण कार्यालय आले आहे. या ईमारतीचा आंबटशौकीन गैरवापर करीत असल्याच्या माहीतीवरुन स्टिंग ऑपरेशन केले असता जुन्या जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ज्या ठिकाणी कक्ष होता त्याजवळ काही जण पत्त्यांचा डाव खेळताना दिसून आले. तेथे गेल्याबरोबर त्यांनी तेथून पळ काढला. तर जुन्या नगरपरिषद कार्यालयात ४ युवक लुडो गेम खेळताना दिसून आलेत. तसेच परिसरात दारुच्या बॉटल जागोजागी पडून आल्यात. त्यानंतर पदमतिर्थ तलाव रस्त्यावर असलेल्या पडीक जागेत काही युवक झाडाझुडपात दारु पितांना आढळून आलेत.


वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गंत कुठेही अवैध धंदे सुरु नाहीत. कुठेही कोणी असा प्रकार करण्याचा प्रयत्नही केला तर ताबडतोब गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांना कल्पना असते. तरी सुध्दा लपून छपून कोणी शासकी ईमारतीत, किंवा झाडाझुडपाखाली जुगार खेळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- योगीता भारव्दाज
ठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन

 

Web Title: Sting Operation: Liquor parties and gambling in a abondend government building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.