पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:12+5:302021-09-23T04:47:12+5:30
व्यावसायिकांना विविध स्वरुपांचे टॅक्स आकारण्यात येतात. जे नियमित टॅक्स भरतात त्यांना टॅक्सबाबत इत्यंभूत माहिती आहे. परंतु दरराेज काम करून ...
व्यावसायिकांना विविध स्वरुपांचे टॅक्स आकारण्यात येतात. जे नियमित टॅक्स भरतात त्यांना टॅक्सबाबत इत्यंभूत माहिती आहे. परंतु दरराेज काम करून आपला संसाराचा गाडा चालविणाऱ्यांना आपण टॅक्स भरता का याची विचारणा केली असता आमचे इन्कमच नाही तर टॅक्स कशाला भरायचे असे सांगण्यात आले. तर काहींनी फक्त दरवर्षी नगरपरिषदेचा घर टॅक्स आम्ही भरताेय. दुसरा काेणत्याच स्वरूपाचा टॅक्स भरावा लागत नसल्याचे सांगण्यात आले.
आपण भरता का टॅक्स?
कामगार ऑटाे : दरराेज घर चालेल एवढेच पैसे हाती येतात. टॅक्स काेठून भरायचा व कशाचा?
चालक : ५ ते ६ हजार महिन्याचा पगार मिळताे. यात घर चालत नाही, तर टॅक्स काेठून भरायचा?
भाजीपाला विक्रेता : इनमिन ४०० ते ५०० रुपयांचा धंदा, इन्कमच नाही तर टॅक्स कशाचा भरायचा?
सिक्युरिटी गार्ड : इन्कमनुसार टॅक्स असताे असे वाटते. आपण काेणताच टॅक्स भरत नाही.
फेरीवाला : नगरपरिषदवाले दरराेज रस्त्यावर उभे राहण्याचे पैस घेतात. तेच पैसे भरताे आम्ही.
साफसफाई कामगार : हाे, आम्ही नियमित टॅक्स भरताेय. त्यामध्ये घर टॅक्स, पाणीपट्टी कराचा समावेश आहे.
सलून चालक : शासनाला टॅक्स देण्याइतके आमचे इन्कम नाही. पाेटापाण्यापुरते कमावताे.
लाॅन्ड्री चालक : काेणता टॅक्स, कशाचा टॅक्स.