केंद्र पुरस्कृत योजनांतील निराधारांचे अनुदान थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:52 AM2017-10-07T01:52:07+5:302017-10-07T01:52:23+5:30

वाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५  हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.  आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागद  पत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभा र्थींना देण्यात आल्या असून, ते प्राप्त न झाल्यास संबंधित लाभा र्थींचे अनुदान बंदच करण्यात येणार असल्याचे संबंधित  अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Stop the fundamentalists of centrally sponsored schemes | केंद्र पुरस्कृत योजनांतील निराधारांचे अनुदान थांबविले

केंद्र पुरस्कृत योजनांतील निराधारांचे अनुदान थांबविले

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवप्रमाणपत्रांच्या पूर्ततेची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: केंद्र पुरस्कृत विविध अर्थ सहाय्यित योजनांतील ५  हजारांहून अधिक लाभार्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.  आधार क्रमांक, वयाचा दाखल्यासह विविध आवश्यक कागद  पत्रे सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून या लाभा र्थींना देण्यात आल्या असून, ते प्राप्त न झाल्यास संबंधित लाभा र्थींचे अनुदान बंदच करण्यात येणार असल्याचे संबंधित  अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा पकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, तसेच  इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना   आधार क्रमांक, वयाचा दाखला, अंपंगत्वाचे ऑनलाइन प्रमाण पत्र, तसेच तलाठय़ाच्या दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रे  संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाकडे सादर करण्याच्या  सूचना मागील काही महिन्यांपूर्वी देण्यात आल्या आहेत.  त्यामधील ५ हजारांहून अधिक लाभार्थींनी अद्यापही ही कागद पत्रे सादर केली नाहीत. 
यामध्ये एकट्या मंगरुळपीर तालुक्यातील तब्बल ३ हजार  लाभार्थींचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय  वृद्धापकाळ नवृत्ती वेतन योजनेचे १९ हजार ४८0 लाभार्थी  आहेत. त्याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतने  योजनेचे ४४0, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग नवृत्ती वेतन  योजनेचे ५३ लाभार्थी मिळून एकूण १९ हजार ९७३ लाभार्थी  आहेत. त्यामधील पाच हजारांहून अधिक लाभार्थींना कागदपत्रे  प्रशासनाकडे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे या लाभा र्थींचे अनुदान थांबविण्यात आले आहे.

Web Title: Stop the fundamentalists of centrally sponsored schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.