पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी भर जहागीर येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:06 PM2020-10-20T19:06:56+5:302020-10-20T19:07:02+5:30
Farmers Agitation Washim District वंचित बहुजन आघाडीतर्फे भर जहॉगीर येथे २० आॅक्टोबर रोजी रास्तारोको आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहॉगीर (वाशिम) : नुकसानग्रस्त भागात पिकांची पाहणी करावी, आणेवारी ५० पेक्षा कमी करावी, पीकविमा मिळावा,ओला दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल माफ करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे भर जहॉगीर येथे २० आॅक्टोबर रोजी रास्तारोको आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
संततधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक भागात अद्याप पंचनामे नाहीत. शेतकºयांना भरपाई मिळावी याकरीता तातडीने पंचनामे करावे, ओला दुष्काळ जाहिर करावा यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांनी भर जहॉगीर बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात जनविकास आघाडीच्या पदाधिकारीदेखील सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, डॉ. रवींद्र मोरे, जि.प. सदस्य उषा गरकळ, स्वप्निल सरनाईक, अमोल भुतेकर, पुरूषोत्तम तहकिक, बबन हरिमकर, पं.स. उपसभापती सुभाष खरात, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला शेवाळे, तालुकाध्यक्ष सैय्यद अकिल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त बहुसंख्येने उपस्थित होते.