रास्ता रोको; वाहतूक ठप्प!
By admin | Published: July 19, 2016 02:16 AM2016-07-19T02:16:42+5:302016-07-19T02:16:42+5:30
अहमदनगर जिल्हय़ातील कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून वाशिम व मालेगाव येथे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला.
वाशिम : अहमदनगर जिल्हय़ातील कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून वाशिम व मालेगाव येथे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. कोपर्डी (जि. अहमदनगर) येथे बलात्कार व हत्येची घटना घडली असून, सदर घटनेच्या निषेधार्थ स्थानिक पाटणी चौक येथे सोमवारी दुपारी संभाजी ब्रिगेड, जिजाऊ संघटना व मराठा सेवा संघाच्यावतीने धरणे आंदोलन राबविण्यात आले. मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड या सामाजिक संघटनांनी संपूर्ण जिल्हाभर ठिकठिकाणी निदर्शने करुन घटनेचा निषेध केला. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या प्रकरणाचा खटला जलद न्यायालयात चालवा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीवनी बाजड, सुरेखा आरु, मीना गायकवाड, वैशाली बुंधे, प्रियंका बोरकर, अंजली खोडे, रंजना पांडे, सुनीता राऊत, सविता बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष बोरकर, बालाजी वानखडे, राजू कोंघे, गणेश सुर्वे, कृष्णा चौधरी, विशाल नायक, पुरुषोत्तम पाटील, बबन आरु, आसीफ खा पठाण, रितेश देशमुख, संतोष शिंदे आदींसह मोठय़ा संख्येत पदाधिकारी उपस्थित होते. मालेगाव : संभाजी ब्रिगेड मालेगावच्यावतीने शेलूफाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. सायंकाळी ५ वाजेदरम्यान रास्ता रोको करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.