शेलुबाजार येथील वळणमार्गासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:34 IST2018-11-26T15:34:05+5:302018-11-26T15:34:28+5:30
शेलूबाजार (वाशिम) : संभाव्य अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी शेलुबाजार येथील वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वाजपासून व्यापारी व गावकºयांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली.

शेलुबाजार येथील वळणमार्गासाठी रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : संभाव्य अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी शेलुबाजार येथील वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वाजपासून व्यापारी व गावकºयांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. यामुळे औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील शेलुबाजारनजीक वाहन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संभाव्य अपघाता्च्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या मागणीकरीता २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वाजतानंतर गावकºयांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ठोस आश्वासन दिल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा गावकºयांनी घेतला आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गाबरोबरच मंगरूळपीर ते अकोला, शेलुबाजार मार्गे वाशिम ते कारंजा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चारही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.