विनापरवाना पेट्रोल विक्रीची दुकानदारी बंद

By admin | Published: May 12, 2017 05:16 PM2017-05-12T17:16:42+5:302017-05-12T17:16:42+5:30

अनेकांनी खुद्द पेट्रोल विक्री बंद केल्याचे दिसून आले.

Stop the sale of unpaid petrol sales | विनापरवाना पेट्रोल विक्रीची दुकानदारी बंद

विनापरवाना पेट्रोल विक्रीची दुकानदारी बंद

Next

वाशिम : अत्यंत ज्वलनशिल द्रव पदार्थांमध्ये मोडणारा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोलची दिवसाढवळ्या दुकानदारी थाटून जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये अवैधरित्या पेट्रोलविक्रीचा  प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे  ह्यस्टिंग आॅपरेशनह्णलोकमतने १२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची धास्ती घेत कारवाईच्या बडगा आपल्यावर उगारल्या जावू नये  म्हणून अनेकांनी खुद्द पेट्रोल विक्री बंद केल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तोंडगाव, वारा जहाँगीर, कळंबा महाली, कोंडाळा महाली, तांदळी शेवई, पार्डी टकमोर, काजळांबा, रिसोड तालुक्यातील केनवड, वाकद, लोणी, मोप, भर, मांगूळझनक, केशवनगर, चिखली, महागाव, आसेगावपेन, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी, शेंदूरजना आढाव, फुलउमरी, वाईगौळ, हातना, कुपटा, इंझोरी, मानोरा, मालेगाव तालुक्यातील मेडशी, करंजी, जऊळका रेल्वे, डोंगरकिन्ही, कारंजा तालुक्यातील कामरगाव, उंबर्डाबाजार, धनज बु., लोहगाव, दोनद, खेर्डा बु., खेर्डा कारंजा यासह मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी, वनोजा, तऱ्हाळा, शेलुबाजार, आसेगाव (पो.स्टे.) या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पानटपरी, हॉटेल्स, गॅरेज, पंक्चरची दुकाने आदींमधून पेट्रोलची अवैधरित्या विक्री सुरु असतांना कोणाचेही लक्ष दिसून येत नव्हते. अतिशय ज्वलनशिल द्रव्य विक्रीमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने लोकमतच्यावतिने यावर प्रकाश टाकण्यात आला असता जिल्हयातील ४२ गावांमध्ये हा प्रकार केल्या जात असल्याचे पुढे आले होते. केवळ १० ते १५ रुपये लिटर मागील नफयामुळे हा जिवघेणा प्रकार केल्या जात होता. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करताच बहुतांश ठिकाणावरील दुकानदारांनी स्वताहून पेट्रोल विक्री बंद केल्याचे १२ मे रोजी दिसून आले.

पानठेले बंद
ग्रामीण भागात ज्याठिकाणच्या पानठेल्यांवर पेट्रोलची विक्री व्हायची ते दुकाने आज बंद आढळून आले. यासंदर्भात चौकशी केली असता पेट्रोल विक्री संदर्भात पेपरला बातमी आली म्हणून दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपल्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होवू नये म्हणून दुकानदारांनी स्वताहून खबरदारी घेतली.

Web Title: Stop the sale of unpaid petrol sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.