विजेसंदर्भातील प्रश्नांवर शिवसेनेचा मंगरूळपिरात रास्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:11 PM2018-08-11T13:11:26+5:302018-08-11T13:15:59+5:30

मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा खंडित होणाऱ्यां विजपुरवठ्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत.

Stop Shiv Sena's agitation in mangrulpir questions related to electricity | विजेसंदर्भातील प्रश्नांवर शिवसेनेचा मंगरूळपिरात रास्ता रोको 

विजेसंदर्भातील प्रश्नांवर शिवसेनेचा मंगरूळपिरात रास्ता रोको 

googlenewsNext
ठळक मुद्दे नवीन विद्यूत रोहित्र बसवावा, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे यावेळी दिसून आले.


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा खंडित होणाऱ्यां विजपुरवठ्यामुळे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. दरम्यान, विजेसंदर्भातील या प्रश्नावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत शहरातील पेठ खदानपूर वीज उपकेंद्रानजिक शनिवार, ११ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.
यासंदर्भातील निवेदनात शिवसेनेने नमूद केले आहे, की मंगरूळपीर तालुक्यातील दाभा, कोळंबी, जोगलदरी, सावरगाव, साळंबी, लावना, वरुड येथील गावठाण फिडर, कृषि फिडरवर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा नेहमीच खंडीत असतो. त्यावर पर्याय म्हणून कोळंबी येथील कृषिपंपाची वीज कोळंबी फाट्यावरून जोडण्यात यावी, तालुक्यातील सर्व गावांमधील जीर्ण झालेल्या वीज वाहिल्या बदलून त्याठिकाणी नवीन वाहिन्या टाकण्यात याव्या, कोळंबी येथे नवीन विद्यूत रोहित्र बसवावा, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, मंगरूळपीर शहर प्रमुख विवेक नाकाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे यावेळी दिसून आले.

Web Title: Stop Shiv Sena's agitation in mangrulpir questions related to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.