भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको
By नंदकिशोर नारे | Published: July 1, 2024 04:26 PM2024-07-01T16:26:43+5:302024-07-01T16:27:33+5:30
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाशिम : रिसाेड येथील महत्त्वाचा मार्ग असलेल्या मुख्य चौकात लोणी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
८ ते १० एप्रिल दरम्यान उन्हाळी पीक नुकसानाचे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनला भाव देण्यात यावा, स्प्रिंकलचे सबसिडीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी घटनास्थळी येऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, रवींद्र चोपडे, रिसोड शहराध्यक्ष विकास झुंगरे, संजय सदार, राहुल बोडखे, युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. रास्ता रोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रिसोड पोलीसांकडून चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.