शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वसारी येथे रास्ता रोको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:48 PM2019-10-30T14:48:16+5:302019-10-30T14:48:27+5:30

रिसोड ते मालेगाव या महामार्गावरील वसारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop at Vasari for farmers' demands! | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वसारी येथे रास्ता रोको !

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वसारी येथे रास्ता रोको !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हेक्टरी ५० हजार रुपये मदत तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रिसोड ते मालेगाव या महामार्गावरील वसारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी यासह फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, जाचक अटी न लावता ओला दुष्काळ जाहिर करावा, तातडीने पंचनामे करून सरसकट मदत करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वसारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोल, वैभव जाधव, सुधीर वाघमारे, मदन लादे, माणिक जाधव, दत्ता लादे, दत्तात्रय नवघरे, पंडित नवघरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: Stop at Vasari for farmers' demands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.