जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको !
By admin | Published: June 5, 2017 06:59 PM2017-06-05T18:59:37+5:302017-06-05T18:59:37+5:30
वाशिम - विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात सोमवारी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात सोमवारी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.
रिसोड येथे लोणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी संपाच्या समर्थनार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. शेलुबाजार येथील कृषी सेवा केंद्र संचालकांनी दुकाने बंद ठेवून या संपाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिरपूर येथे ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले. यावेळी हनुमानाच्या मुर्तीला दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खावू घातला. रिसोड तालुक्यातील कुकसा फाटा येथे काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. मानोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मालेगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.