पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी रास्ता रोको
By संतोष वानखडे | Published: December 11, 2023 03:31 PM2023-12-11T15:31:49+5:302023-12-11T15:37:19+5:30
गेल्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान नुकसान झाले होते.
वाशिम : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वाईगौळ (ता.मानोरा) येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
निवेदनानुसार, गेल्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाई घोषित केली. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना भरपाइ मिळाली. मात्र वाईगौळ येथील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. ही मदत मिळावी या मागणीसाठी अनेकदा तहसील कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. परंतू, याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी वाईगौळ येथे रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनास निवासी नायब तहसीलदार एम. व्हि.अस्टूरे, तलाठी कांबळे, संदीप आडे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले. कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.