शासकीय खरेदीतील शेतमाल साठवणुकीचा तिढा सुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:42 PM2020-06-07T16:42:07+5:302020-06-07T16:43:10+5:30

वखार महामंडळाने खासगी गोदामे भाड्याने घेतल्यामुळे ही अडचण दूर झाली आहे.  

Storage of government procured commodities Godowan awalable now | शासकीय खरेदीतील शेतमाल साठवणुकीचा तिढा सुटला 

शासकीय खरेदीतील शेतमाल साठवणुकीचा तिढा सुटला 

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: वखार महामंडळाच्या गोदामांत साठवणुकीसाठी जागा नसल्याने तूर, हरभरा या शेतमालाची शासकीय खरेी अडचणीत आली होती. आता वखार महामंडळाने खासगी गोदामे भाड्याने घेतल्यामुळे ही अडचण दूर झाली आहे.  
वाशिम जिल्ह्यात विदर्भ कोआॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून कारंजा आणि मंगरुळपीर येथे, तर नाफेडच्यावतीने वाशिम, मालेगाव, रिसोड आणि मानोरा येथे तूर आणि हरभºयाची हमीदराने शासकीय खरेदी सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेत तूर विकण्यासाठी ४६ हजार ५९८ शेतकºयांनी नोंंदणी केली होती, तर हरभरा विकण्यासाठी ८ हजार १२४ शेतकºयांनी नोंदणी सुरू केली होती. ही खरेदी आधीच संथगतीने असताना कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागल्याने २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांची पंचाईत झाली. त्यानंतर पणन संचलनलयाने शेतमाल खरेदी प्रक्रिया जिवनावश्यक वस्तू सेवेत मोडत असल्याने कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाय योजना करून ही खरेदी सुरू करण्याचे आदेश राज्यभरातील संबंधित विभागाला दिले. त्यानंतरही विविध अडचणींमुळे वाशिम जिल्ह्यात खरेदीला विलंब झाला. त्यातच वखार महामंडळातील गोदामांत शेतमाल साठवण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा ही खरेदी अडचणीत आली. खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर पैशांची जुळवाजुळव करणाºया शेतकºयांना त्यामुळे अडचणी येऊ लागल्या. शेतकºयांनी याची दखल घेण्याची मागणी केल्यानंतर वखार महामंडळाने  खासगी गोदामे भाड्याने घेत, साठवणुकीची अडचण दूर केली. 
 
मोजणीला वेग देण्याची मागणी                                                                                                      

जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्रांवर ५ जूनपर्यंत तूर विकण्यासाठी नोंदणी करणाºया ४६ हजार ५९८ शेतकºयांपैकी २८ हजार ८६२ शेतकºयांना एसएमएस पाठविल्यानंतर केवळी ९ हजार ९९७ शेतकºयांकडील ९१ हजार ९६५ क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली, तर नी नोंंदणी केली होती, तर हरभरा विकण्यासाठी नोंदणी केलेल्या ८ हजार १२४  शेतकºयांपैकी ४ हजार १८ शेतकºयांना एसएमएस पाठविल्यानंतर केवळ ३ हजार २९१ शेतकºयांकडील ४२ हजार २५४ क्विंटल हरभºयाचीच मोजणी होऊ शकली आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकºयांना पैशांची आवश्यकता आहे. त्यात मशागत, पेरणीची कामेही करावी लागणार असल्याने शेतमाल मोजणीला वेग देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Storage of government procured commodities Godowan awalable now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.