वाशिम जिल्ह्यात वादळ- वाऱ्यामुळे विद्युत खांब उन्मळून पडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:45 PM2018-04-12T15:45:55+5:302018-04-12T15:45:55+5:30
वाशिम : ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडले, तारा तुटल्या. यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला.
वाशिम : ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही झाडे तसेच विद्युत खांब उन्मळून पडले, तारा तुटल्या. यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला.
वाशिम शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. ११ एप्रिल रोजी सायंकाळनंतर वाशिम शहरासह ग्रामीण भागातहीवादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. मालेगाव तालुक्यातील वाघी बु. येथे गारपिटही झाली. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड, शेलुबाजार, मालेगाव तालुक्यातील राजूरा, मेडशी, मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात वादळवाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळवाºयाचा जोर प्रचंड असल्याने काही झाडे उन्मळून पडली तसेच विद्युत पोलही खाली पडले. वाशिम शहरातील ११ एप्रिलच्या रात्रीदरम्यान सिव्हिल लाईन, नवीन आययुडीपी, म्हाडा कॉलनी या परिसरातील विद्युत तारा तुटल्या होत्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होता. १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. म्हाडा कॉलनीतील तुटलेल्या तारा रात्रीदरम्यानच जोडण्याचे काम महावितरणच्या कर्मचाºयांनी पूर्ण केले. दरम्यान, शेलगांव, जाभंरून(जाहागीर), ब्रम्हा या मार्गावर वादळवाºयामुळे विद्युत खांब पडला तर काही खांब वाकले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. वादळवाºयामुळे जेथे-जेथे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे, तेथे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.