अकोला नाक्यावरील पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:48+5:302021-04-18T04:40:48+5:30

00 रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी वाशिम : शहरातून रिसोडकडे जाणाºया लाखाळापर्यंतच्या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे दुभाजक उभारण्यात यावे. यामुळे वाहतूक ...

Street lights on Akola Naka closed | अकोला नाक्यावरील पथदिवे बंद

अकोला नाक्यावरील पथदिवे बंद

Next

00

रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी

वाशिम : शहरातून रिसोडकडे जाणाºया लाखाळापर्यंतच्या रस्त्यावर चांगल्या दर्जाचे दुभाजक उभारण्यात यावे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज सरकटे यांनी शुक्रवारी केली.

00

रुग्णालयासमोर अतिक्रमण

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच किरकोळ साहित्य विक्रीची दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. या प्रकारामुळे रुग्णवाहिका ने-आण करताना अडथळा होत आहे.

000

००

छोट्या मालवाहू वाहनांतून जडवाहतूक

वाशिम : छोट्या स्वरूपातील मालवाहू वाहनांच्या टपावर गज, स्प्रिंकलर पाईप, अँगल अशा जड वस्तूंची वाहतूक केली जात आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष पुरवून हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशी मागणी होत आहे.

00

केनवड परिसरात दवंडीद्वारे जनजागृती

वाशिम : केनवड परिसरातही कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले.

00

जऊळका परिसरात सुविधांचा अभाव

वाशिम : जऊळका रेल्वे जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील दलित वस्तीमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी गुरूवारी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

00

कृषीपंप जोडणीची प्रतिक्षाच

वाशिम : कृषीपंप जोडणीसाठी गत वर्षी किन्हीराजा परिसरातील ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज दिले होते. रब्बी हंगाम संपल्यानंतरही जवळपास ४० शेतकऱ्यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

00

बाजार समितीत शेतमालाची आवक

वाशिम : सोयाबीनच्या बाजाराभावात वाढ झाल्याने वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक येत असल्याचे दिसून येते. कोरोंनाविषयक नियमाचे पालन करीत खरेदी सुरू आहे.

00

0000

तोंडगाव येथे आणखी एक रुग्ण

वाशिम : वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल १७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपकार्तील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

00

रेती वाहतूकप्रकरणी कारवाईच नाही

वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून रिसोड-वाशिम या मार्गावरून रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असून अशा वाहनांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई होणे अपेक्षीत आहे.

00

देयक वसुलीची मोहीम प्रभावित

वाशिम : अनेक ग्राहकांकडे विद्युत देयकांची लाखो रुपयांची रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली होती. परंतू, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोहिम प्रभावित होत असल्याचे दिसून येते.

०००

कोरोना लसीकरण मोहिम ठप्प

वाशिम : लसीचा साठा संपल्याने रिसोड तालुक्यात लसीकरण मोहिम ठप्प पडली आहे. लसीचे डोस केव्हा मिळणार याकडे नागरिकांची लक्ष लागून आहे. मागणीच्या तुलनेत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिम वारंवार प्रभावित होते.

०००

विहिर अधिग्रहण करण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात पाणीटंचाईचे सावट असून, संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी विहिर अधिग्रहण करण्यात यावे किंवा नळयोजना अंमलात आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Street lights on Akola Naka closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.