‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस वाशिममध्ये प्रारंभ; खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:40 PM2018-01-04T15:40:57+5:302018-01-04T15:42:28+5:30

वाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर २५ व्या राष्ट्रीय ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस गुरूवार, ४ जानेवारीपासून थाटात प्रारंभ झाला.

'Strength Lifting' in Washim; Spontaneous participation of the players | ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस वाशिममध्ये प्रारंभ; खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस वाशिममध्ये प्रारंभ; खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

Next
ठळक मुद्देयेत्या ७ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार असून त्यात विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत २२ राज्यातील ५०० खेळाडू आणि ५० तांत्रिक अधिकाºयांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेच्या खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.


वाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर २५ व्या राष्ट्रीय ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ स्पर्धेस गुरूवार, ४ जानेवारीपासून थाटात प्रारंभ झाला. महाराष्ट्र ‘स्ट्रेंथ लिफ्टिंग’ असोसिएशनव्दारा भारतीय स्ट्रेंथ लिफ्टिंग महासंघाअंतर्गत येत्या ७ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार असून त्यात विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. 
स्ट्रेंथ लिप्टींग या स्पर्धेत यशस्वी होणाºया खेळाडूंमधून इंडोनेशिया येथे होणाºया सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. वाशिम येथे ज्युनिअर, सिनिअर व मास्टर्स, पुरुष व महिला स्पर्धा विविध वजन गटात आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत २२ राज्यातील ५०० खेळाडू आणि ५० तांत्रिक अधिकाºयांनी सहभाग नोंदविला आहे. खेळाडूंची व अधिकाºयांची भोजन व निवास व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेच्या खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र स्ट्रेंथ लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत डोणगावकर, महासचिव विनायक जवळकर यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीकांत मेश्राम, अंकुश एल्गुंदे, सुर्यकांत उंबरकर, नावेदखान, आॅल स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब गोटे, नगरसेवक बाळू मुरकुटे, प्राचार्य डॉ. गुल्हाने, राजु वानखेडे, सतिश वानखेडे, अनिल थडकर, कुलदीप बदर, प्रल्हाद आळणे, देशमुख, पवन राऊत, सौरभ गंगावने, महेश बोथीकर, सतिश पवार, बादशाह धामणे व वाशिम जिल्हा स्ट्रेंथ लिफ्टिंग असोसिएशनचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: 'Strength Lifting' in Washim; Spontaneous participation of the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.