पोलीस विभागाकडून कठोर कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:55+5:302021-03-06T04:39:55+5:30
.................. प्रवास महागल्याने नागरिक त्रस्त वाशिम : कोरोना काळात रेल्वेचा प्रवास दुप्पट ते तिपटीने महागला. यासह पॅसेंजर रेल्वे अद्याप ...
..................
प्रवास महागल्याने नागरिक त्रस्त
वाशिम : कोरोना काळात रेल्वेचा प्रवास दुप्पट ते तिपटीने महागला. यासह पॅसेंजर रेल्वे अद्याप बंदच आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन रेल्वेचे प्रवासभाडे कमी करावे, अशी मागणी होत आहे.
...............
बालविवाहांवर प्रशासनाची नजर
वाशिम : जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यानुषंगाने आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी शुक्रवारी दिली.
.............
जऊळक्यात आढळले ८ कोरोनाबाधित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे आज एकाच दिवशी ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी सुरक्षेस्तव उपाययोजनांची चोख अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
.................
कंत्राटींना मिळतेय कामाची संधी
मेडशी : कोरोनाच्या काळात कामावरून कमी केलेल्या कंत्राटी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना आता पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मेडशी परिसरातही असे काही कंत्राटी कर्मचारी असून, त्यांच्याप्रती समाधान व्यक्त होत आहे.
............
२१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ७ मार्च ते २१ मार्च या कालावधीत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१च्या कलम ३७ (१)(३) नुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी शण्मुगराजन एस.यांनी निर्गमित केले आहेत.
................
विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन
वाशिम : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला, मुलींसाठी विविध विषयांचे चर्चासत्र होणार असून, योगा, क्रीडा, जीवन संजीवनी, महिला दिनाचे महत्त्व, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता, महिलाविषयक कायदे, महिलाविषयक सकस आहार आदी विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच प्रशासनातील महिला अधिकारी यांचा सत्कार ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे.
................
शनिवारी, रविवारी विशेष शिबिरांचे आयोजन
वाशिम : ज्या नवीन मतदारांनी एकल (युनिक) मोबाइल क्रमांक नोंदविला आहे, अशा मतदारांना ई-इपीक डाऊनलोड करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित मतदारांनी ई-इपीक डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी केले आहे. यासाठी ६ व ७ मार्च रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.