बसमध्ये काेराेना नियमांचे काटेकाेर पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:08+5:302021-02-25T04:56:08+5:30
आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवासीसह सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी ...
आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवासीसह सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील. याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक याबाबत नियोजन करतील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार बसमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्यांना दंडसुध्दा आकारण्यात येत आहे. परंतु काही बसेसमध्ये मास्क न लावताच प्रवासी दिसून येत असले तरी प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात नसल्याचे दिसून येत आहे. जे मास्क घालत नाही त्यांना मास्क लावण्याची सक्ती केली जात आहे.
............
खासगी वाहनचालक करताहेत उल्लंघन
खासगी प्रवासी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीनचाकी वाहनात चालकव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी आहे. परंतु या नियमाचे पालन हाेताना दिसून येत नाही.