प्रशासनाकडून वीकेंड निर्बंधांची कठोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:26 AM2021-07-19T04:26:07+5:302021-07-19T04:26:07+5:30
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळला जावा म्हणून नगरपरिषद ...
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळला जावा म्हणून नगरपरिषद प्रशासन सतर्क असून, या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधक पथक तयार करून आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, पथकप्रमुख राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनात हे पथक शनिवार-रविवारी संपूर्ण शहरात फेरफटका मारीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना नियमांचे पालन करीत आहेत की नाही याची पडताळणी करीत आहे. जे आस्थापनाधारक नियमांना बगल देत आस्थापना उघडत आहेत, त्यांना नगरपरिषद प्रशासनाकडून ५०० रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. पथकात सुधीर चकोर, रवी जयदे, विजय सावते, अश्विन महाजन, आदींचा सहभाग आहे.