शिरपूर येथे संचारबंदीचे काटेकोर पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:00+5:302021-03-01T04:49:00+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन कोरोना संसर्ग अधिक वाढू नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबवीत आहेत. मागील ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन कोरोना संसर्ग अधिक वाढू नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबवीत आहेत. मागील काही दिवसापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता आस्थापने आणि दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली. तरी मागील चार ते पाच दिवसात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू केली. संचारबंदीदरम्यान मेडिकल, दवाखाने, दूध डेअरी सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली. मात्र इतर दुकाने कडेकोट बंद होती. मागील चार ते पाच दिवसात शिरपूर येथील २३१ जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी गावातील ३ तर ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाॅर्ड क्रमांक १ चा भाग असलेल्या गौळखेडा येथील एक जण कोरोनाबाधित असल्याचे माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पोलीस दिवसभर गावात पेट्रोलिंग करताना दिसून आले.