वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर; कामकाज प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:11 PM2018-08-08T13:11:22+5:302018-08-08T13:13:10+5:30

वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८  आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले.

Strike another day in Washim district; Work affected | वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर; कामकाज प्रभावित 

वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर; कामकाज प्रभावित 

Next
ठळक मुद्देप्रशासकीय कामकाज ठप्प पडले असून, आरोग्य सेवेवरही या संपाचा परिणाम जाणवत आहे.जिल्ह्यातील सहाही तहसिल व पंचायत समिती कार्यालयासमोर मंडप टाकून कर्मचाºयांनी संपात सहभागी नोंदविला.शिक्षक या संपात सहभागी असल्याने दुसºया दिवशीही जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद होत्या.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८  आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प पडले असून, आरोग्य सेवेवरही या संपाचा परिणाम जाणवत आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने ७, ८ व ९ आॅगस्ट दरम्यान राज्यव्यापी संप पुकारला आहे. ८ आॅगस्ट रोजी या संपात जिल्ह्यातील महसूल विभागातील २९९ कर्मचारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जवळपास २२५० कर्मचारी, नगर परिषदेचे जवळपास ३५० कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक संघटनेचे जवळपास ४५० शिक्षक, आयटीआयचे जवळपास ५० कर्मचारी, शिक्षकेतर संघटनेचे जवळपास ६५० कर्मचारी, आरोग्य विभागातील जवळपास २०० परिचारिका या संपात सहभागी झाल्याचा दावा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष तात्याराव नवघरे यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्ह्यातील सहाही तहसिल व पंचायत समिती कार्यालयासमोर मंडप टाकून कर्मचाºयांनी संपात सहभागी नोंदविला. जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य सेवेवर या संपाच परिणाम जाणवला.
 आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून तहसिल कार्यालय व निवडणूक विभागाने १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केलेली आहे. या संपामुळे ७ आॅगस्टपासून निवडणूकविषयक कामकाजही ठप्प पडल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शिक्षकांच्या दोन संघटनेचे शिक्षक या संपात सहभागी असल्याने दुसºया दिवशीही जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद होत्या. ग्रामसेवक संघटनाही या संपात सहभागी असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज प्रभावित झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या परिचारिका, आरोग्य सेवक, अभियंता संघटनेने या संपाला पाठिंबा म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केले. संपामुळे बहुतांश कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला.

Web Title: Strike another day in Washim district; Work affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.