मालेगावच्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
By admin | Published: May 11, 2017 06:54 AM2017-05-11T06:54:13+5:302017-05-11T06:54:13+5:30
५४ हजारांचा मुद्देमाल जप्त : तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : शहरातील मेहकर रोडवरील स्वागत ढाब्यासमोर असलेल्या गोडावूनमध्ये अवैधरीत्या जुगार खेळविला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ९ मे रोजी धाड टाकली. यावेळी जुगाराचे ५४ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यासोबतच तीन आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री महालक्ष्मी रिक्रेशन क्लब या नावाने चालणाऱ्या कार्ड क्लबची वैधता संपल्यानंतरही परवान्याचे उल्लंघन करुन अवैधरीत्या क्लब चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून धडक कारवाई करण्यात आली. याप्रसंगी तेथील संतोष सीताराम कव्हर याच्या ताब्यातून टीव्ही मॉनिटर, डीव्हीआर, तीन लाकडी राउंड टेबल, १८ नग खुर्च्या असा एकंदरित ५४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच गजानन रामचंद्र वाझुळकर, सचिव अरूण विश्वनाथ बळी, संतोष कव्हर (सर्व रा.मालेगाव) या तीन आरोपींविरुद्ध कलम १३१ ह्यअह्ण मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.