दमदार पाऊस

By Admin | Published: August 6, 2015 12:49 AM2015-08-06T00:49:39+5:302015-08-06T00:49:39+5:30

वाशिम जिल्ह्यात १६४ मि.मी. पावसाची नोंद : अडाण नदीला पूर; प्रकल्पाच्या पाण्यात वाढ.

Strong rain | दमदार पाऊस

दमदार पाऊस

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यात ३ ऑगस्ट मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले अहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १६४.२0 मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे अडाण नदीला पुरासह प्रकल्पाच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत १६४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी दिवसभर पाऊस बरसला.४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ८ वाजेपर्यंत वाशिम तालुक्यात १५0 मि.मी., मालेगाव तालुक्यात १४५ मि.मी., मंगरुळपीर तालुक्यात १८४.२0 मि.मी., मानोरा तालुक्यात १९0 मि.मी., तर कारंजा तालुक्यात २0६ मि.मी. असा एकूण ९८५.२0 मि.मी. पाऊस पडला. जून ते ५ ऑगस्टपर्यंत सरासरी पाऊस ४५५.८७ मि.मी. अपेक्षित होता. ५ ऑगस्टपर्यत ४५५.३५ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी दिवसभर कुठे कमी, तर कुठे जोरात पाऊस सुरू होता. या पावसामुळे नदी, नाले ओथंबून वाहण्यास सुरुवात झाली असून, कारंजा परिसरात तीन मजली इमारतीचा कोपरा ढासळला. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. प्रशासनाच्यवतीने ते हटविण्यात आले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील पोलीस चौकीमध्ये पाण्ी शिरल्याने पोलिसांना पाणी काढण्यासाठी कसरत करावी लागली. कारंजा तालुक्यात कारंजा येथे २0६, कामरगाव २0५, धनज १0६, पोहा १८0, खेर्डा १८७, हिवरा २0५, येवता १६0 तर उंबर्डा येथे १२0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कारंजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. जलसाठय़ात वाढ जिल्ह्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासह अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी मिटला असून पिकांनाही जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जुलैअखेरपर्यंत जलसाठा कमी होता त्यामध्ये अचानक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये ३९.१७ दलघमी जलसाठा जुलै अखेरपर्यंत होता. यामध्ये ५९ दलघमीने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील लघु प्रकल्पातही ६१.६२ दलघमी जलसाठा होता यामध्येही ११.0४ दलघमीने वाढ झाली आहे.

Web Title: Strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.