बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विज्ञान केंद्राची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:26+5:302021-08-12T04:46:26+5:30
सदावर्ते यांची विशेष ऑनलाइन मुलाखत कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी घेतली. या ऑनलाइन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ ...
सदावर्ते यांची विशेष ऑनलाइन मुलाखत कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी घेतली. या ऑनलाइन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉक्टर रवींद्र काळे यांची तर इतर प्रमुख मान्यवरांमध्ये प्राचार्य कृषी महाविद्यालय रिसोड डॉ. आशिष आपतुरकर व प्राध्यापक विस्तार शिक्षण तथा रावे प्रभारी कृषी महाविद्यालय रिसोड डी. के. मसुदकर यांची उपस्थिती होती. डॉ. आर. एल. काळे यांनी तज्ज्ञांद्वारे शिफारशीत केलेल्या कमी खर्चाच्या पीकसंरक्षण तंत्राचा प्रमुख खरीप पिकात वापर करून विविध पिकांवरील प्रमुख किडींचे व रोगाचे प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आवाहन केले. आशिष आपतुरकर यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळींच्या संदर्भात व इतर प्रमुख खरीप पिकांतील कीड व रोगाच्या व्यवस्थापनासंदर्भात शेतकरी बंधूंमध्ये कृषी महाविद्यालय रिसोड येथील रावे विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिकाद्वारे व विविध चर्चासत्रद्वारे जनजागरण करण्यात येईल, यासंदर्भात सर्व उपस्थितांना आश्वासित केले. तांत्रिक सत्रात ऑनलाइन मुलाखतीमध्ये डॉ. ए. के. सदावर्ते यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध प्रश्नांचे निराकरण करताना प्रमुख खरीप पिकावरील विविध किडी, त्यांची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार इत्यादी बाबींवर विस्तृत विवेचन केले व प्रकाश टाकला.