महामार्गाच्या माध्यमातून जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:34 PM2018-11-30T14:34:29+5:302018-11-30T14:34:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आधारे जलस्त्रोत पुनरुज्जीवीत व्हावेत यासाठी जलहक्क चळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आधारे जलस्त्रोत पुनरुज्जीवीत व्हावेत यासाठी जलहक्क चळवळीचे कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांची धडपड सुरू आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय जलसंधारण व रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांना पत्र पाठवून जलस्त्रोताचे खोदकाम करून महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज वापरण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यात सातत्याने पाण्याची समस्या उद्भवत असून, भुजल पातळी अत्यंत खालावली आहे. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ८०० मी. मी. आहे. जिल्ह्यात १० मोठ्या नद्या वाहतात, तसेच अनेक पुरातन व नवीन तलावही आहेत. वर्षानुवर्षे या जलस्त्रोतातील गाळ उपसा झाला नसल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. आता जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची कामे प्रगतीपथावर असून, या कामांच्या आधारे जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी यापूर्वीही आपण केली मंत्री महोदयांकडे केली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची जलस्त्रोत पुनरुज्जीवनासाठी सांगड घातल्यास जिल्ह्यात ८६,५६,९१८ ब्रास गौण खनिज उपलब्ध होते. त्यातून जवळपास १६.५१८ स.घ.मी. एवढा जलसाठा निर्माण होतो. शासन निर्णयानुसार १ स.घ.मी. जलसाठा निर्माण करण्यासाठी १ लाख ४४ हजार ०४७ रुपये खर्च येतो. त्यामुळे जिल्ह्यातील कामांचा आधार घेतला, तर २३७.८५ कोटी रुपयांची बचत अपेक्षीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी गौण खनिजाची पूर्तता करताना जलस्त्रोतांचे खोलीकरण व पुनरुज्जीवन करावे.