ग्रामीण युवकांची स्वयंरोजगार निर्मितीसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:24+5:302021-07-24T04:24:24+5:30
रिसोड तालुक्यातील वडजी हे गाव कृषी विज्ञान केंद्राने तांत्रिक सहकार्यासाठी दत्तक घेतले असून, येथील काही अल्पभूधारक ग्रामीण युवकांनी कृषी ...
रिसोड तालुक्यातील वडजी हे गाव कृषी विज्ञान केंद्राने तांत्रिक सहकार्यासाठी दत्तक घेतले असून, येथील काही अल्पभूधारक ग्रामीण युवकांनी कृषी विज्ञान केंद्राचे फळबागतज्ज्ञ निवृत्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फळबागेची लागवड केली आहे. फळबाग हे वर्षातून एकदाच देणारे उत्पन्नाचे स्रोत असल्याने ग्रामीण युवक शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करतात, जे तांत्रिकदृष्ट्या दोन वर्षांनंतर योग्य नाही. शेतीसोबतच शेतीनिगडित जोडधंदे करता येऊ शकतात का, या उद्देशाने वडजी येथील अल्पभूधारक ग्रामीण युवकांनी केंद्राला भेट दिली. भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांनी शेतीनिगडित उद्योग एकात्मिक शेती संकल्पनेच्या माध्यमातून खालावत असलेले मानवी आरोग्य व जमिनीचे आरोग्य निरोगी व अबाधित ठेवून ग्रामीण युवकाला प्रतिमहिना १० ते १५ हजार रुपये मिळविता येतील, अशा दृष्टीने मार्गदर्शन केले.