औषध विक्रेते संपावर

By Admin | Published: October 14, 2015 02:03 AM2015-10-14T02:03:05+5:302015-10-14T02:03:05+5:30

ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्याच्या संघटना संपावर.

Struggling drug vendors | औषध विक्रेते संपावर

औषध विक्रेते संपावर

googlenewsNext

वाशिम: अखिल भारतीय औषधी विक्रेत्याच्या संघटनेने संपूर्ण भारतात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात १४ ऑक्टोबर रोजी बुधवारला देशव्यापी बंद पुकारला आहे. या संपात वाशिम जिल्हय़ातील औषध विक्रेते सहभागी झाले आहेत. राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून, याद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषणे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादाय औषधांची विक्री सुरू आहे. ही विक्री बंद करण्यासाठी औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. बेकायदेशीरपणे चालू असलेला ऑनलाइन औषधी व्यापारास आळा घालणे, औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेस वाचविणे, कमी दर्जाच्या अप्रमाणित, डुप्लिकेट औषधांच्या शिरकावाची दाट शक्यता निर्माण होऊ शकते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँन्टिबायोटिक्स, वेदनाशामक अथवा अन्न औषधांच्या वापरास चालना मिळणे, युवकांमध्ये नशेच्या औषधांचा वापराचा मोठा धोका, ग्रामीण भारतात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता, देशातील ८ लाख औषध विक्रेते व ८0 लाख यांच्या परिचारावर आर्थिक संकट, सक्षम प्रशासकीय यंत्रणेचा अभाव व अँलोपॅथी वापरास सक्षम डॉक्टरांचा तुटवडा आदी मुद्यांवरून व्यापार्‍यांनी बंदची हाक दिली आहे. या देशव्यापी औषधी विक्रेत्यांच्या संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष ब्रिजलाल नेनवाणी, सचिव आशीष बंड व कोषाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Struggling drug vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.