वृक्ष जगविण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:56+5:302021-02-17T04:49:56+5:30
------------------ जि.प. शाळेचे निर्जंतुकीकरण वाशिम : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा भरविताना कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजना ...
------------------
जि.प. शाळेचे निर्जंतुकीकरण
वाशिम : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा भरविताना कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याने मंगळवारी पोहरादेवी येथील जि.प. शाळेत निर्जंतुकीकरण करण्यात आले.
-------
आधार कार्ड नोंदणीत खोळंबा
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सुविधेत वारंवार अडथळा येत आहे. याचा परिणाम आधार कार्ड नोंदणीत येत असून, मंगळवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवर यामुळे नोंदणी व दुरुस्तीसाठी मोठी गर्दी उसळली होती.
-----------
महाबीजची सोयाबीन खरेदी
वाशिम : जिल्ह्यात बीजोत्पादन प्रकल्पांतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणांची खरेदी महाबीजकडून केली जात आहे. त्यात निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत यंदा २ हजार क्विंटलची घट आली आहे. त्यामुळे पुढील हंगामात सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे.
---------
३६ वाहनांवर कारवाई
वाशिम : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेने मंगळवारी वाशिम-पुसद मार्गासह इतर काही ठिकाणी मोहीम राबवित ३६ चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
------------------
दुचाकी घसरून युवक जखमी
वाशिम : मंगरूळपीर-वाशिम मार्गावर साखरा फाट्यानजीक सोमवारी नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून चालक गंभीर झाल्याची घटना घडली. मार्गावर जाणाऱ्या वाहनचालकांनी त्याला आधार देऊन रस्त्याच्या बाजूला केले.