जात प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:04 PM2017-08-08T20:04:41+5:302017-08-08T20:07:06+5:30

शिरपूर जैन: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राखीव जागांसाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असलेल्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मालेगावच्या तहसील कार्यालयात मंगळवारी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

Struggling to remove caste certificate! | जात प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपड !

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपड !

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीचे वारेइच्छुक उमेदवरांना जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यकजात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोतवाल बुकाची नक्कल असणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राखीव जागांसाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असलेल्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मालेगावच्या तहसील कार्यालयात मंगळवारी एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
येत्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. यावेळी प्रथमच थेट जनतेमधून ग्रामपंचायत सरपंचांची निवड होणार असल्याने यावेळच्या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंच पदासंह, सदस्यांच्या जागांसाठीची आरक्षण प्रक्रिया मागील महिन्यातच पार पडली आहे. त्यामुळे आता राखीव जागांसाठी दावेदारी दाखल करण्यात चुरस सुरू झाली आहे. निवडणूक लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र नसणाºयांकडून ते काढण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी तहसील कार्यालयात कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मालेगाव येथील तहसील कार्यालयात कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title: Struggling to remove caste certificate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.