वादळी वाऱ्याने झुकलेले खांब सरळ करण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:36+5:302021-06-18T04:28:36+5:30

जिल्ह्यात मान्सूनचे धडाकेबाज आगमन झाले आहे. गेल्या ८ जूनपासून पाऊस पडत असून, १३ जूनचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी विविध ...

Struggling to straighten the pillars bent by the wind | वादळी वाऱ्याने झुकलेले खांब सरळ करण्याची धडपड

वादळी वाऱ्याने झुकलेले खांब सरळ करण्याची धडपड

Next

जिल्ह्यात मान्सूनचे धडाकेबाज आगमन झाले आहे. गेल्या ८ जूनपासून पाऊस पडत असून, १३ जूनचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी विविध भागांत पाऊस पडत आहे. पावसाचा जोरही चांगला असून, वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. वीज खांब झुकल्याने आणि उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महावितरणने हे खांब सरळ करण्याची मोहीमच सुरू केली आहे. जिल्ह्यात जवळपास २८ पेक्षा अधिक वीज खांब गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सरळ केले. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासाही मिळाला आहे. गुरुवारी मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना मोरेसह रिसोड तालुक्यातील रिठद आणि इतर ठिकाणचे वीज खांब सरळ करण्यात आले.

Web Title: Struggling to straighten the pillars bent by the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.