ऑटाेमधून शाळेत नेले जात आहेत विद्यार्थी(टिप- बातमीमध्ये ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांची दिलेली संख्या बोल्ड केली आहे. कृपया चेक करावी. खूपच जास्त वाटतेय.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:34+5:302021-02-11T04:42:34+5:30
जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. विद्यार्थीही शाळेत येत आहेत. शाळांकडून पालकांनी मुलांना शाळेत साेडणे व घेऊन जाण्याचे आवाहन ...
जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. विद्यार्थीही शाळेत येत आहेत. शाळांकडून पालकांनी मुलांना शाळेत साेडणे व घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. पालकांनी काही दिवस नियमित शाळेत आपल्या पाल्यांना पाठविले, परंतु अनेक पालकांना दरराेज शाळेत पाेहोचविणे शक्य नसल्याने, त्यांनी दरवर्षी आपल्या पाल्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटाेचालकांशी संपर्क साधला, तर त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ऐवजी १ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. अनेक पालकांना नाईलाजाने ती मान्य केली आहे. शहरामध्ये २५च्या जवळपास ऑटाे विद्यार्थी घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे.
-----------
शाळांकडून खबरदारी
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरात असलेल्या शाळांकडून पालकांना मुलांना स्वत: घेऊन येणे व नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
--------
कामाच्या व्यस्ततेमुळे मुलांना शाळेत नेआण करणे कठीण जात आहे. याकरिता ऑटाेचालकांशी संपर्क केला असता, अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी केल्या जातेय. नाईलाज असल्याने ऑटाेचालकांची मागणी पूर्ण करावी लागत आहे.
- बाळू भाेयर, पालक
------
प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटाेंना शालेय विद्यार्थी यांना काेंबून ऑटाेत नेण्याची परवानगी नाही. शहरात काेराेनापूर्वी विद्यार्थी ऑटाेत बसून जायचे, परंतु सद्यस्थितीत अशी परिस्थिती दिसून येत नाही. तसे आढळून आल्यास ऑटाेचालकांवर कडक कारवाई निश्चित करण्यात येईल. काेराेना संसर्ग पाहता, पालकांनीही मुलांना ऑटाेमध्ये पाठवू नये. शहरात विद्यार्थी काेंबून ऑटाे आढळून आल्यास कारवाई केल्या जाईल.
- नागेश माेहाेड, शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम
----------
वाशिम शहरात ऑटाेंची संख्या - १९०
शालेय विद्यार्थी नेणारे ऑटाे - २५
पाचवी ते आठवी शालेय विद्यार्थी - ८१,५१८
नववी ते बारावीचे विद्यार्थी - ८,२१,५१,८२,१५१
------