बस सेवेकरिता विद्यार्थीनींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By admin | Published: January 6, 2015 12:44 AM2015-01-06T00:44:18+5:302015-01-06T00:44:18+5:30
मानव विकास मिशनची बस सुरू करण्यासाठी सायखेडा येथील शालेय विद्यार्थीनींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या दिला.
वाशिम : मानव विकास मिशनची बसगाडी नसल्याने विद्यार्थीनिंना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. जी बस विद्यार्थीनिंच्या सेवेत आहे त्याचे जास्त पैसे मोजावे लागत आहेत. या मार्गावर मानव विकास मिशनची बस सुरू करावी या मागणीसाठी सायखेडा येथील ४३ विद्यार्थीनिंनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
सायखेडा येथील ४३ विद्यार्थीनी तोंडगाव येथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीनिंची संख्या मोठया प्रमाणात असतांना मानव विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील मुलींना मोफत बस सेवेचा लाभ नाही. यामुळे विद्यार्थीनिंना ङ्म्रीकृष्ण विद्यालय तोंडगाव यांचे खासगी बसने प्रवास करावा लागतो. याकरीता प्रतिमहिना ३00 रुपये मोजावे लागतात. यावर्षी मात्र ते ४00 रुपये करण्यात आले आहे.