महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
By Ram.deshpande | Published: July 25, 2017 08:00 PM2017-07-25T20:00:28+5:302017-07-26T18:58:22+5:30
मानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
सदर वृक्षदिंडी पंचायत समितीपासून शहरातील मुख्य मार्गावर निघाली. वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांच्या हाती वृक्षाचे रोपे, फलक होते. झाडे जगवा, झाडे लावा, असे नारे विद्यार्थी देत होते. वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. असा संदेश देणारी फलके आकर्षीत करुन घेत होती. वृक्षदिंडीचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण होते. प्राचार्य डॉ.एन. एस. ठाकरे, नायब तहसीलदार प्रकाश खाटीक, डॉ. इकबाल खान, प्रा. आर. के .ठाकरे, प्रा.एम.पी. ठाकरे, प्रा.पि. डी. राऊत, प्रा. डॉ.निळे, प्रा. पि. एन .कांबळे, प्रा. आर .टी .ब्राम्हण, प्रा. सुनिल काळे यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणातून तहसीलदार चव्हाण म्हणाले की, वृक्षसंवर्धनाचा व वृक्ष लागवडीचा उद्देश समाजाला समजला पाहिजे यासाठी महाविद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी काढली ती प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी प्राचार्य ठाकरे यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रोपे तयार करुन ती लावावी आणि त्याचे संगोपन करण्याचा ध्यास घेतला आहे. यावर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी किमान एक हजार झाडे लावतील तसेच स्वच्छता अभियानांतर्गत कार्य सुरु आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना समाज कार्याची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश आहे. प्रास्ताविक भाषण प्रा.हेमंत चव्हाण यांनी केले ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा जो वसा घेतला तो अभिनंदनीय आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.पंकज राऊत यांनी केले. आभार प्रा.एम.पी.ठाकरे यांनी केले. वृक्षदिंडीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.