समायोजनातील शिक्षक पुर्वीच्या शाळेवर गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:20 PM2017-07-24T13:20:34+5:302017-07-24T13:20:34+5:30
दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे .
मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद विद्यालयातील प्रकार
मंगरुळपीर : येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयातील पाच शिक्षक समायोजनाव्दारे कार्यरत असताना यापैकी चार शिक्षक परस्पर कार्यमुक्त होवून त्यांच्या पुर्वीच्या शाळेवर गेल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यालयातील पटसंख्येचा विचार करुन दुसरे शिक्षक देण्यात अले अशी मागणी मुूख्याध्यापकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना पत्राव्दारे केली आहे.
मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे, की गतवर्षी जिल्हा परिषद विद्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये पाच शिक्षकांचे समयोजन करण्यात आले होते. परंतु यापैकी पी.बी.मुक्केमवार, एम.आर. कन्नुरे, व्ही.व्ही.पाटील व जी.बी.ठाकरे हे आमच्या विद्याल्यातून परस्पर त्यांच्या पुवीच्या शाळेवर रुजू झाले. त्यामुळे शैक्षणिक कामात अडचण निर्माण होत आहे. तेंव्हा विद्यार्थी पटसंख्येचा विचार करुन वरील शिक्षकांऐवजीविद्यालयात दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे . येथील जिल्हा परिषद विद्यालय हे नामांकित असून या विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. परंतु गत काही वर्षात शिक्षकांअभावी या शाळेत विद्यार्थ्यांना अडचण भासत आहे. तर सध्या ग्रामपंचायतीच् व विद्यालयात समन्वय नसल्याने या ठिकाणी कुरघोडीचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.