छात्रसंघ निवडणूक: वाशिम शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 06:24 PM2018-01-20T18:24:36+5:302018-01-20T18:26:29+5:30
वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती अंतर्गत येणाऱ्या छात्रसंघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्चस्व ठेवले आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपने विजयी झेंडा रोवला आहे. बरेच ठिकाणी अभाविपचे उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. शनिवारी ही माहिती प्राप्त झाली.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रथमच ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत राजस्थान महाविद्यालयातून संतोष विष्णू राऊत, गोटे महाविद्यालयातून शिवानी राजेंद्र गोदारा, एसएमसी कॉलेजमधून भारती गायकवाड हे विजयी झाले आहेत. यासह अनेक महाविद्यालयात छात्रसंघाच्या पदासाठी उभ्या असलेल्या अभाविपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूकीतील यशासाठी अभाविपचे नगरमंत्री जगदीश इंगोले, सहमंत्री शिवम कदम, यशवंत काळे, रुपेश हेंद्रे, वाशिम शाखा अध्यक्ष प्रा. सुरेश मापारी, उपाध्यक्ष प्रा. अंकुश सोमाणी, प्रा. सुनिल उज्जैनकर, जिल्हा संघटनमंत्री मिथुन हेलवटकर, जिल्हा संयोजक रुषांत कोरान्ने, चिन्मय लक्रस, कुणाल गुप्ता, अविनाश गावंडे, श्रीवेद केळकर, अजय बोरकर, श्रीहरी जहागीरदार आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.