पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:28 PM2019-08-17T15:28:59+5:302019-08-17T15:29:13+5:30
जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले.
मानोरा : सांगली, कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे अनेक घर उध्दवस्त झालेत. या पुरग्रस्तांना सर्वच स्तरावरुन मदतीचा ओघ वाढत असताना मानोरा तालुक्यातील जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांनी जमा केलेले खाऊचे पैसे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविलेत. चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
श्री. सेवालाल बहूउद्देशीय संस्था नाईक नगर मानोरा व्दारा संचालीत जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत इतर शाळांनीही पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण राठोड ,सचिव प्रा.अनिल चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका स्वरुपा चव्हाण, शाळेच्या शिक्षीका सिमा आडे, सोनाली थोराईत, फौजीया खान, आश्विनी तायडे, मेघा मात्रे, रक्षा राऊत, स्वाती मोेरे, सुनिल चव्हाण, मनोहर राठोड व सविता सोनोने, तसेच राधीका जाधव, रिया थोराईत, रुद्र राठोड, ईश्वरी थोराईत, सिध्दी आडे, सनेला खान, देवेंद्र चव्हाण या विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे मंडळ अधकारी एस.बी.जाधव, तलाठी एस.एस.राठोड यासह उपस्थितांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. तसेच मातोश्री सुभद्राबाई पाटील कला व विज्ञान व कै.पांडूरंग ठाक रे वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मानोरा येथील संपूर्ण मार्केटमध्ये जावुन कोल्हापुर व सांगली येथील पुरग्रस्तासाठी मदत निधी गोळा करुन एक नवीन आदर्श निर्माण केला.