विद्यार्थ्यांना ‘जीवनविद्येचे’ मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:10 PM2017-09-20T19:10:56+5:302017-09-20T19:11:25+5:30
वाशिम : जीवनविद्येच्या ज्ञानाची पेरणी का केली पाहिजे, यासह जीवनविद्या घरोघरी गेली की प्रत्येक घरात सुख नांदेल हा उद्देश समारे ठेवून विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे मोफत मार्गदर्शन जिल्हयातील शाळा , महाविद्यालयांमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जीवनविद्येच्या ज्ञानाची पेरणी का केली पाहिजे, यासह जीवनविद्या घरोघरी गेली की प्रत्येक घरात सुख नांदेल हा उद्देश समारे ठेवून विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे मोफत मार्गदर्शन जिल्हयातील शाळा , महाविद्यालयांमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे.
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या आशिर्वादाने खेडयापाडयातील व दुर्गम भागातील शाळा , कॉलेजमधील गरजु विद्यार्थ्यांना सदगुरुंच्या मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम सन २०१० पासून जीवनविद्या मिशन कांजुरमार्ग शाखेच्यावतिने राबविण्यात येत आहे. जेथे जेथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाणार आहे तेथे तेथे ग्रंथदिंडीसुध्दा काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पांडुरंग मोरे, दिलीप निर्मळ जिल्हयात प्रबोधक म्हणून कार्य करीत आहेत.
या उपक्रमास अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखा वाशिम, अॅड. रामकृष्ट राठी विधिज्ञ महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून यांच्या मार्गदर्शनात २० व २१ सप्टेंबर रोजी शहरातील महाविद्यालय कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले आहे. २०सप्टेंबर रोजी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय ,सुशिलाताई जाधव महाविद्यालय व शिवाजी शाळा येथे माग्दर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालतीबाई कन्या शाळा, राजीव गांधी विद्यालय निमजगा दुपारी १ वाजता तर शरदचंद्र पवार विद्यालय सुपखेला येथे दुपारी ३ वाजात कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतिने करण्यात आले आहे.