आधार नोंदणीसह विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:22 AM2017-08-04T02:22:28+5:302017-08-04T02:23:38+5:30

वाशिम: यावर्षीपासून राज्यात ९ ऑगस्ट हा दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे आधार कार्ड नोंदणीसह विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

Students' Health Checkup with Aadhaar Enrollment | आधार नोंदणीसह विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी

आधार नोंदणीसह विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देआदिवासी दिनाचे औचित्य पूर्वनियोजन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यावर्षीपासून राज्यात ९ ऑगस्ट हा दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे आधार कार्ड नोंदणीसह विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या ठरावाद्वारा ९ ऑगस्ट हा दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून जाहिर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने यावर्षीपासून हा दिन राज्यातही ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली येणारी सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी मॉडेल स्कूल, एकलव्य निवासी पब्लिक स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय आदी ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर, आधार कार्ड नोंदणी, जातीचे दाखले व अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणार्‍या दस्तऐवजांविषयी माहिती देण्यासंदर्भात विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचनाही आदिवासी विकास विभागाने दिलेल्या आहेत. 
आदिवासी उपयोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपयोजना क्षेत्रात रोजगाराच्या संधी, शेती विषयक योजना, आरोग्य व पोषक विषयक योजनांची माहिती, वन उत्पादने व शेतीमाल यावर आधारित उद्योग याबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्याचे नियोजन करावे, अशा सूचना २ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. या सुचनांच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात ९ ऑगस्टला विविध कार्यक्रम व शिबिरांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्‍यांना गुरूवारी दिले आहेत.
 

Web Title: Students' Health Checkup with Aadhaar Enrollment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.