कारंजा येथे विद्यार्थ्यांना योगाचे धडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:13 PM2019-03-15T15:13:01+5:302019-03-15T15:13:42+5:30
कारंजा लाड (वाशिम) : स्थानिक झील इंटरनॅशनल स्कूल येथे योग शिक्षणाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने १४ मार्च रोजी एक दिवसीय योग शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : स्थानिक झील इंटरनॅशनल स्कूल येथे योग शिक्षणाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने १४ मार्च रोजी एक दिवसीय योग शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.
निरोगी जीवनासाठी योग आवश्यक असून, विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी पतंजली महिला योग समिती कारंजाने पुढाकार घेतला. समिती प्रभारी व योग प्रशिक्षका अर्चना कदम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले व विविध योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. नियमित योगा केल्याने अभ्यासात एकाग्रता निर्माण होते, शरीर तंदुरूस्त राहते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच योगाला महत्त्व द्यावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग मार्गदर्शक स्वाती डफडे, ऋचा शंकरापुरे, शाळेचे मुख्याध्यापक सतीश बिजवे व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.