जातीय सलोख्यासाठी विद्यार्थ्यांची "दौड"!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:04 PM2017-07-19T19:04:19+5:302017-07-19T19:04:19+5:30
मालेगाव (वाशिम) : समाजातील जातीय सलोखा कायम टिकावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या "जातीय सलोखा दौड"मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होत या कार्यात भरीव योगदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : समाजातील जातीय सलोखा कायम टिकावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या "जातीय सलोखा दौड"मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होत या कार्यात भरीव योगदान दिले. हा उपक्रम १९ जुलै रोजी राबविण्यात आला.
विविध जातीधर्मात सारे होणारे सण-उत्सव साजरे होत असताना यादरम्यान शांतता नांदावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना खडा पहारा द्यावा लागतो. जनतेतूनही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवे, याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मालेगाव येथे १९ जुलै रोजी ह्यजातीय सलाखो दौडह्ण हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त गावातून २ किलोमिटर ह्यदौडह्णचे आयोजन करण्यात आले. यासाठी ठाणेदार संजय गवई यांनी विशेष पुढाकार घेतला.