रिसोडच्या गंगा मा इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:17+5:302021-09-22T04:46:17+5:30

रिसोड येथील गंगा माँ विद्या मंदिरमध्ये मागील वर्षी शिक्षण घेतलेल्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण फी भरल्याशिवाय शाळेचा दाखला ...

Students of Risod's Ganga Ma English School got justice | रिसोडच्या गंगा मा इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

रिसोडच्या गंगा मा इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

googlenewsNext

रिसोड येथील गंगा माँ विद्या मंदिरमध्ये मागील वर्षी शिक्षण घेतलेल्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण फी भरल्याशिवाय शाळेचा दाखला दिला जाणार नाही, असा पवित्रा शाळेतील कर्मचाऱ्यांनी व स्थानिक प्रशासनाने घेतला होता. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे शुल्क भरण्यास ते सक्षम नव्हते; परंतु शाळा प्रशासनाकडून संपूर्ण फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नसल्याचे सांगण्यात येत होते. शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलच्या दोन्ही प्रशासनाने फीमध्ये ५० टक्के सवलत दिली. त्याच धर्तीवर आमचीही फी माफ करावी, असा आग्रह पालकांकडून होत होता; परंतु त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्याकडे आपली व्यथा मांडली. पालकांचा परिस्थितीचा विचार करता आमदार सरनाईक यांनी गंगा माँ इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाशी चर्चा करून संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क काही प्रमाणात माफ करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ४० टक्के सवलत दिली.

Web Title: Students of Risod's Ganga Ma English School got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.