शाळा सोडून विद्यार्थी पोहचले उपोषण मंडपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:14 PM2018-09-05T12:14:50+5:302018-09-05T12:27:37+5:30
शाळा सोडून ही समस्या निकाली निघावी यासाठी शाळा सोडून विद्यार्थीही उपोषण मंडपात पोहचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम ): येथील मुख्य चौकात प्रवासी निवाऱ्याअभावी महिला प्रवाशी तसेच शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी निवारा उभारावा या मागणीकरिता विनोद अनंतराव लांभाडे ५ सप्टेंबरपासून शेलुबाजार येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. शाळा सोडून ही समस्या निकाली निघावी यासाठी शाळा सोडून विद्यार्थीही उपोषण मंडपात पोहचले.
येथील मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाला असल्याने शाळकरी विद्यार्थींना भर पावसात उघड्यावर उभे राहून एसटी बसची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. गत पाच सहा वर्षांपासून सदर प्रवासी निवारा उध्वस्त होवून सुध्दा संबधीतानी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्याने सामाजीक कार्यकर्ते विनोद लाभांडे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला . यासंदर्भात जिल्हाधिकाºयांसह संबधितांना निवेदनाव्दारे कळविण्यात आले होते. तसेच या संदर्भात रास्ता रोको व विविध आंदोलने करण्यात आली आहे. याकडे संबधितांनी दुर्लक्ष केल्याने ५ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.