वाशिमच्या एमएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली महाराष्ट्र तंबाखुमूक्त करण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:35 PM2018-02-03T13:35:29+5:302018-02-03T13:37:05+5:30
वाशिम: जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने (डब्ल्यूएचओ) राबविण्यात येत असलेल्या तंबाखुविरोधी अभियानांतर्गत महाराष्ट्र तंबाखुमूक्त करण्याची शपथ शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
वाशिम: जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने (डब्ल्यूएचओ) राबविण्यात येत असलेल्या तंबाखुविरोधी अभियानांतर्गत महाराष्ट्र तंबाखुमूक्त करण्याची शपथ शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम येथील एमएसई शाळेत ३ फेबु्रवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंबाखुमूक्त करण्याची शपथ घेतली.
डब्ल्यूएचओच्यावतीने जगभरात तंबाखुविरोधी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यात ‘शाळा होतील तंबाखुमूक्त, प्रत्येक मुल आरोग्य संपन्न’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाशिम येथील एमएसई प्रायमरी स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंबाखुमूक्त करण्याची शपथ घेतली आहे. शाळांमध्ये तंबाखुमूक्त अभियान राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये तंबाखुविरोधी मानसिकता निर्माण होऊन भविष्यात हे विद्यार्थी अधिक निरोगी जीवन जगतील. विद्यार्थ्यांची सामाजिक, जैविक आणि आर्थिक उन्नती होण्यासाठीच तंबाखुमूक्त शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे. एमसएसई शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष अनिल धुमकेकर, सचिव अतुल धुमकेकर, प्रार्याच शिवकन्या जल्लेवार, आपला जिल्हा तंबाखुमूक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषित करून आपल्या जिल्ह्यातील नव्या पिढीला सदृढ, सक्षक आणि आरोग्य संपन्न करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद सारिका धुमकेकर, स्नेहा कांघे, जयश्री पाचपोर, रेणुका जोशी, प्रशांत शेळके, शिवाजी गोटे, उमेश चव्हाण, अंकिता शेवनकर, योगेश ढेकणे, शंकर गोटे, गणेश धामणे, सिमा आखोडे, अनंत मराठे, उज्वला इंगळे, मंजुषा देशपांडे, राधा येरले, राणी चौधरी विभाग, अनसिंगकर यांनीही ही शपथ घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनु ताजणे, कमल ढोणे, सारिका शेळके, बंडूभाऊ इंगोले, अंभोरे यांनी परिश्रम घेतले.