जलदिनानिमित्त अडोळी येथे विद्यार्थ्यांनी घेतली जलप्रतिज्ञा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:39 PM2019-03-22T15:39:56+5:302019-03-22T15:40:00+5:30
वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जि.प.शाळेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जि.प.शाळेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गो.रा.मुंदडा होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जलदूत राजकुमार पडघान होते.सर्व प्रथम उपस्थितीतांनी सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. राजकुमार पडघान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व उपस्थितीतांना जलप्रतिज्ञा दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाणी हे जीवन आहे. पाण्याचा उपयोग हा पाहिजे तेवढाच घ्यावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले. यावेळी शिक्षक डी. ज. शिंदे, गणेश जाधव यांनी सुध्दा पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाला हनुमान गोटे, राजू इढोळे, विश्वनाथ इढोळे, नंदकुमार चिकटे, डी. श्री. शिंदे , हरणे, सपना ढाकणे अदिसह विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू इढोळे यांनी व आभार प्रदर्शन गणेश जाधव यांनी केले.