ज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी विद्यार्थिनींची धडपड, महामार्गावर बसून बसची प्रतिक्षा: अनियमित फे-यांमुळे शिक्षणावर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 01:43 PM2017-11-07T13:43:41+5:302017-11-07T13:44:54+5:30
ज्ञानाचे धडे गिरवून स्वत:सह समाजाचा विकास साधण्यासाठी तालुक्यातील मसोला गावच्या विद्यार्थिनी मोठी धडपड करीत आहेत.
वाशिम : ज्ञानाचे धडे गिरवून स्वत:सह समाजाचा विकास साधण्यासाठी तालुक्यातील मसोला गावच्या विद्यार्थिनी मोठी धडपड करीत आहेत. यवतमाळ-नांदेड महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातून पायी चालत यायचे आणि बसची प्रतिक्षा करीत मार्गालगत तातटकळत बसायचे, ही त्यांची दिनचर्याच झाली आहे. दरदिवशी सकाळ ११ वाजता हे चित्र पाहायला मिळते. त्यातच बसफेºया वेळेवर येत नसल्याने या विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे दिसते.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, ही बाब लक्षात घेऊन ज्ञानार्जन करण्यासाठी शेकडो विद्यार्थिनी मोठी धडपड करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. याची प्रचिती मंगरुळपीर तालुक्यातील वाशिम-मंगरुळपीर मार्गावर पाहायला मिळते. तालुक्यातील शेकडो विद्यार्थिनी शहरी भागांत शिक्षण घेतात किंवा परिसरातील गावात असलेल्या मोठ्या शाळेत प्रवेश घेतात. यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागतो. या विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने विशेष करून मानव मिशनच्या बसफेºयाही सुरू केल्या आहेत; परंतु या बसफे-यांची संख्या आधीच अपुरी असताना त्यात वेळेच्या अनियमितेचाही मोठा खोडा ठरत आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थिनींना महामार्गालगत तासनतास बसून बसची प्रतिक्षा करावी लागते. असाच प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील मसोला येथे पाहायला मिळतो. मसोला येथील २० २५ विद्यार्थिनी दररोज सकाळी १०.३० वाजतापासून यवतमाळ-नांदेड मार्गावर धानोरा आणि मंगरुळपीर येथे जाण्यासाठी तासनतास बसची प्रतिक्षा करताना दिसतात. या सर्व मुली ८ वी ते १० पर्यंतचे शिक्षण घेणाºया अर्थात अल्पवयीन आहेत. महामार्गावर बसची प्रतिक्षा करताना त्यांची स्थिती केविलवाणी असते. मार्गावर भरधाव धावणारी वाहने, आपल्याच नादात दुचाकी पळविणारे बेदरकार युवक यांच्या गफलतीमुळे या विद्यार्थिंनीच्या जिवाला धोकाही आहे.