शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले

By दिनेश पठाडे | Published: January 31, 2024 07:05 PM2024-01-31T19:05:24+5:302024-01-31T19:05:31+5:30

या रेखाटलेल्या सर्व चित्रांचे एकत्रित प्रदर्शन महासंस्कृती महोत्सवात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कलादालनात लावण्यात आले होते.

Students were overwhelmed to see Shiv Smriti picture-rangoli | शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले

शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले

वाशिम : स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० राज्याभिषेक वर्षानिमित्ताने आयोजित महोत्सवात शिवस्मृती चित्र - रांगोळी कला दालनाला जिल्ह्यातील विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध प्रकारचे चित्र पाहून विद्यार्थी भारावून गेले.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीने २७ ते ३१ जानेवारी दरम्यान  महासंस्कृती महोत्सव घेण्यात आला. ३१ जानेवारीला सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शेकडो नागरिकांनी महोत्सवात हजेरी लावली. दरम्यान, शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे चित्र रेखाटले. या रेखाटलेल्या सर्व चित्रांचे एकत्रित प्रदर्शन महासंस्कृती महोत्सवात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कलादालनात लावण्यात आले होते. या कलादालनात रिसोड येथील रांगोळी कलाकार प्रतीक्षा साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा रांगोळीतून साकारली.

Web Title: Students were overwhelmed to see Shiv Smriti picture-rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.