स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उभारली अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:44+5:302021-07-28T04:43:44+5:30

ग्रामीण भागातील मुलांना योग्य पुस्तके आणि मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे इच्छाशक्ती असूनही मुलं स्पर्धा परीक्षेत अपयशी होतात, अशा सर्व ...

Study set up for competition exam preparation | स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उभारली अभ्यासिका

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उभारली अभ्यासिका

Next

ग्रामीण भागातील मुलांना योग्य पुस्तके आणि मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे इच्छाशक्ती असूनही मुलं स्पर्धा परीक्षेत अपयशी होतात, अशा सर्व मुलांना एकत्र करून, त्यांचा ग्रुप तयार करण्यात आला. त्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. सोबतच गोभणी येथील आदर्श शिक्षक नारायणराव गारडे यांनी स्वतः पुण्यावरून स्पर्धा परीक्षेचे पुस्तके आणली आणि विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली, तसेच श्री शिवाजी हायस्कूल तथा इंदिरा गांधी क म. वि गोभणीचे शिक्षक या सर्व विद्यार्थ्यांना नियमित विविध विषयांचे मोफत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी गोभणी येथील पोलीस पाटील दुर्गादास खोडवे, माजी सभापती श्यामराव उगले, बबनराव गारडे, प्रभाकर साबळे, गणेशराव साबळे, गोभणीचे सरपंच शेषराव राऊत, श्री शिवाजी हायस्कूल गोभणीचे मुख्याध्यापक काळे, तसेच पालक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन भाऊराव साबळे यांनी तर आभार सुरेश केंनवडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश गारडे, भास्कर गारडे, निशांत चव्हाण, गणेश चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Study set up for competition exam preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.