वाशिममध्ये उपप्रादेशिक परिवहन, शहर वाहतूकची वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:51 PM2018-12-22T14:51:13+5:302018-12-22T14:52:30+5:30
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन आणि शहर वाहतूक विभागाच्या वतीने संयुक्तरित्या मोहिम हाती घेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन आणि शहर वाहतूक विभागाच्या वतीने संयुक्तरित्या मोहिम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवार, २२ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य चौकांमध्ये नियमाला बगल देवून वाहने चालविणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहने चालविण्याचा कायदा करून बरीच वर्षे उलटली. मात्र, आजही या कायद्याला कुणीच फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना जवळ बाळगणे, दुचाकी वाहनावर जास्तीत जास्त दोघांनीच बसून वाहन चालविणे यासह अन्य स्वरूपातील वाहतूकीचे नियम पाळण्याकडेही नागरिकांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्याने दैनंदिन घडणाºया अपघातांच्या घटनांमध्ये गंभीर जखमी होणे अथवा वेळप्रसंगी जीव गमवावा लागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ही बाब लक्षात घेवून यापुढे हेल्मेटसक्तीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभाग सक्रीय झाला असून संयुक्तरित्या मोहिम हाती घेण्यात आल्याचे शनिवारी दिसून आले. यादरम्यान दोन्ही विभागांच्या कर्मचाºयांनी ठिकठिकाणी वाहने अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासोबतच हेल्मेटसक्ती, वाहन परवाना जवळ बाळगणे, ट्रीपल सीट वाहतूक टाळणे आदींबाबत जनजागृती केली.